ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

ग्राहकांना सावध राहण्याचा SBI बँकेकडून इशारा; खाते रिकामे होऊ शकते, वेळीच या गोष्टींची काळजी घ्या अन्यथा..

SBI warns customers to be cautious; Account may be empty, take care of these things on time otherwise ..

स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) आपल्या ग्राहकांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना फसवणुकीबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे. एसबीआयने सांगितले आहे की बँक (bank) तपशील, ATM किंवा UPI पिन कोणाशीही शेअर करू नका. भेटवस्तूच्या अमिशाला बळी पडून बनावट लिंकवर क्लिक करू नका, या गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा खाते रिकामे होईल..

वाचा

ग्राहकांनो सावध राहा –

बँक (bank) किंवा त्यांचे कर्मचारी तुम्हाला खाते क्रमांक, डेबिट कार्ड (debit card) तपशील आणि इंटरनेट बँकिंग संबंधित माहिती यासारखी संवेदनशील माहिती कधीही विचारणार नाहीत. त्याच वेळी, बँक OTP मागत नाही किंवा फोन, एसएमएस किंवा ईमेलद्वारे तृतीय पक्षाच्या लिंकवर क्लिक करण्यास सांगत नाही. त्यामुळे एसबीआयच्या (State Bank of India) नावाने कोणत्याही व्यक्तीच्या माध्यमातून अशी माहिती मागवण्यात आलेले मेसेज आले तर सावध व्हा. त्यामुळे ग्राहकांनी त्यांचा खाते क्रमांक, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड तपशील शेअर करू नये. मोबाईल फोन (mobile phone) किंवा मॅसेजवरील कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका. त्याचबरोबर ग्राहकाने बनावट ई-मेल आयडीला उत्तर देऊ नका.

वाचा –

अशी करा तक्रार –

असे संदेश आले तर व्यवस्थित वाचा, व ग्राहक सायबर क्राईमच्या https://cybercrime.gov.in या वेबसाइटवर तक्रारी नोंदवू शकतात. तसेच हेल्पलाइन क्रमांक 155260 वर देखील याबद्दल माहिती देऊ शकतात. तसेच SBI च्या ग्राहकाच्या खात्यातून अनधिकृत व्यवहार होत असल्यास, ते ग्राहक सेवा क्रमांक 1800111109 वर कॉल करू शकतात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button