पु. ल. देशपांडे - मराठी साहित्यिक ओळख

पु. ल. देशपांडे 

Pu. L. Deshpande 

मराठी साहित्यिक 

Marathi Literary 

📲 ज्येष्ठ मराठी साहित्यिक पुल देशपांडे यांच्या जीवन कार्यावर आधारित ऑनलाईन प्रश्नमंजुषा चाचणी सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈

🔻पूर्ण नाव - पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे

🔻टोपणनाव - पु.ल., भाई

🔻जन्म - नोव्हेंबर इ.स. १९१९, मुंबई

🔻मृत्यू - १२ जून, २००० (वय ८०), पुणे

🔻कार्यक्षेत्र - नाटककार, साहित्यकार, संगीतकार, विनोद, तत्त्वज्ञान, दूरचित्रवाणी, संगीत दिग्दर्शक

🔻वडील - लक्ष्मण त्रिंबक देशपांडे

🔻आई - लक्ष्मीबाई लक्ष्मण देशपांडे

🔻पत्नी - सुनीता देशपांडे

🔻पुरस्कार - पद्मश्री सन्मान, महाराष्ट्र भूषण, साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, पद्मभूषण 

✴️पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु. ल. देशपांडे हे लोकप्रिय मराठी विनोदी लेखक होते. तसेच ते प्रसिद्ध अभिनेते, पटकथालेखक, संगीतकार आणि गायकही होते. त्यांना बऱ्याच वेळा महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून ते नेहमी पु. ल. म्हणून ओळखले जातात.

 ✴️पु. ल. देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, होते. त्यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत काम केले.

त्यांच्या पुस्तकांची इंग्रजी आणि कन्नडसारख्या बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरे झालेली आहेत.  दूरदर्शन सुरू झाल्यावर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची पहिली मुलाखत देशपांडे यांनी घेतली होती.  भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ २००२ साली त्यांच्या नावाचे टपाल तिकीट प्रकाशित केले. त्यांना भारतातील चौथा आणि तिसरा सर्वोच्च पुरस्कार अनुक्रमे पद्मश्री (१९६६) आणि पद्मभूषण(१९९०) साली देण्यात आला.

✴️पु.ल.देशपांडे यांचा जन्म मुंबईतील गावदेवी या भागात चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (सी. के. पी.) कुटुंबामध्ये झाला. त्यांचे बालपण जोगेश्वरी येथील सारस्वत कॉलनीत गेले. त्यांनी पार्ले टिळक विद्यालयात शालेय शिक्षण घेतले आणि नंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात ते शिकले. १९४०च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ते काही काळ शाळेमध्ये शिक्षक होते. १९४६ साली ते सुनीताबाईंशी विवाहबद्ध झाले. त्यांचे  आजोबा वामन मंगेश दुभाषी हे एक कवी व साहित्याचे जाणकार होते. रवीन्द्रनाथ टागोर लिखित गीतांजली हा काव्यसंग्रह त्यांनी 'अभंग गीतांजली' या नावाने मराठी मध्ये भाषांतरित केला होता.

मराठी साहित्य व संगीतातील योगदानाव्यतिरिक्त पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले.

१२ जून, इ.स. २००० रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी पुण्यात प्रयाग रुग्णालयात त्यांचे निधन झाले. 

✴️१९३७ पासून नभोवाणीवर पु.ल.देशपांडे छोट्या मोठ्या नाटिकांत भाग घेऊ लागले. त्या वर्षी त्यांनी अनंत काणेकरांच्या 'पैजार' या श्रुतिकेत काम केले. १९४४ साली पु.लंनी लिहिलेले पहिले व्यक्तिचित्र - भट्या नागपूरकर - अभिरुची या नियतकालिकातून प्रसिद्ध झाले. याच दरम्यान त्यांनी सत्यकथामध्ये 'जिन आणि गंगाकुमारी ही लघुकथा लिहिली. २०१४ मध्ये प्रकाशित झालेले 'बटाट्याची चाळ' हे त्यांचे विनोदी पुस्तक प्रसिद्ध आहे.

फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये असताना देशपांडे यांनी चिंतामण कोल्हटकरांच्या 'ललितकलाकुंज'व 'नाट्यनिकेतन' या नाट्यसंस्थांच्या नाटकांतून भूमिका करायला सुरुवात केली.

✴️ १९४७ ते १९५४ या काळात त्यांनी चित्रपटांमध्ये आणि चित्रपटांसाठी काम केले. वंदे मातरम्‌, दूधभात‘ आणि गुळाचा गणपती या चित्रपटांत त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली. गुळाचा गणपती या चित्रपटांत कथा, पटकथा, काव्य, संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन सर्वच पुलंचे होते.

भाग्यरेखा या मराठी चित्रपटात पुलंची भूमिका होती. १९४७ सालच्या मो.ग. रांगणेकरांच्या कुबेर चित्रपटाला देशपांडे यांनी संगीत दिले आणि चित्रपटातील गाणी देखील गायले. वंदे मातरम्‌मध्ये देशपांडे व त्यांच्या पत्‍नी सुनीताबाई यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यात पु.ल. देशपांडे गायक-नट होते. पु.ल.देशपांडे यांचा देवबाप्पा प्रसिद्ध झाला व त्यातील ’’नाच रे मोरा’’ हे गाणे अनेक दशके प्रसिद्धीत राहिले. पुढचे पाऊल या चित्रपटात त्यांनी कृष्णा महाराची भूमिका केली

१९४८साली पु.ल.देशपांडे यांनी तुका म्हणे आता हे नाटक आणि बिचारे सौभद्र हे प्रहसन लिहिले.

✴️ दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते. साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी या दोहोंचे पुरस्कार मिळवणाऱ्या मोजक्या प्रतिभावंतात पुलंचा समावेश होतो. पु.ल. भाषाप्रेमी होते. त्यांना बंगाली, कानडी येत असल्याने ते त्या त्या समाजातील लोकांत सहज मिसळत. पु.ल. देशपांडे यांच्या जीवनावर महेश मांजरेकर 'भाई' - व्यक्ती की वल्ली' या नावाचा मराठी चित्रपट काढला आहे.

✴️ पु. ल. देशपांडे यांचे पुरस्कार - 

🔸साहित्य अकादमी पुरस्कार ("व्यक्ती आणि वल्ली"साठी)- १९६५

🔸पद्मश्री- १९६६

🔸संगीत नाटक अकादमी पुरस्कार- १९६७

🔸संगीत नाटक अकादमी फेलोशीप- १९७९

🔸कालीदास सन्मान- १९८७

🔸पद्मभूषण- १९९०

🔸पुण्यभूषण - १९९२

🔸महाराष्ट्र भूषण पुरस्कार- १९९६

🔸रवींद्र भारती विद्यापीठ(१९७९), पुणे विद्यापीठ(१९८०) आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ(१९९३) कडून मानाची डी. लिट. पदवी

🔸महाराष्ट्र गौरव (बहुरूपी) पुरस्कार

🔸नवीन स्थापन झालेल्या दूरदर्शनसाठी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंची मुलाखत घेणारी पहिली व्यक्ती.


🙏 सौजन्य - इंटरनेट ( विकिपीडिया )


Post a Comment

0 Comments