योजना

Allocation of orchard grants; परभणी जिल्यातील 9 तालुक्यातील शेतकऱ्यांना फळबागेसाठी 2 कोटी 42 लाख रुपयांचे अनुदान वाटप..

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 2 कोटी 42 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले, ही माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात 2018-19 मध्ये 146.62 हेक्टरतर 2019-20 मध्ये 832.71 हेक्टर वर फळबाग लागवड झाली.

वाचा – Excessive Rain Damage Crops | या ९ जिल्ह्यांसाठी ७७४ कोटी रुपये वाटपास मंजुरी, पहा अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी…

दोन्ही वर्षातील मिळून एकूण ९७९.३३ हेक्टरवर लागवड झाली. यामध्ये आंबा ९६.८४ हेक्टर, पेरू १९८.२५ हेक्टर, डाळिंब ८.६० हेक्टर, मोसंबी ५३.६० हेक्टर, लिंबू ११७.११ हेक्टर, संत्रा २८५.६३ हेक्टर, सीताफळ कलमे १०३.४५ हेक्टर, सीताफळ रोपे ३०.९५ हेक्टर, चिंच १.७० हेक्टर, जांभुळ कलमे १ हेक्टर, जांभूळ रोपे २.५० हेक्टर, अंजीर १.६० हेक्टर, चिकू १८.१० हेक्टर या फळपिकांचा समावेश आहे.

२ कोटी ४२ लाख रुपये प्राप्त निधी दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाचे अनुदान मागे राहिले होते. हा निधी तालुक्यांना वितरित करण्यात आला.

1) परभणी तालुक्याला ७० लाख ५५ हजार रुपये,
2) जिंतूर तालुक्याला ६७ लाख ७० हजार रुपये,
3) सेलू तालुक्याला ११ लाख ७० हजार रुपये,
4) मानवत तालुक्याला ५७ लाख ९० हजार रुपये,
5) पाथरी तालुक्याला २ लाख ३१ हजार रुपये,
6) सोनपेठ तालुक्याला ७ लाख २ हजार रुपये,
7) गंगाखेड तालुक्याला ९ लाख ३ हजार रुपये,
8) पालम तालुक्याला२ लाख ३१ हजार रुपये,
9) पूर्णा तालुक्याला ८ लाख १ हजार रुपये असा निधी वितरित करण्यात आला.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button