एक्स्प्लोर

Coronavirus: लसीकरणाचा वेग मंदावल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल, तज्ज्ञांचा इशारा

पुरेसा लसीचा साठा उपलब्ध नसल्याने राज्यात 1 मे पासून 18 वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात होणार नाही.राज्यातील लसीकरणाचा वेग मंदावल्यास कोरोनाची  तिसरी लाट येण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

मुंबई: देशभरात कोरोनाच्या आलेल्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे देशातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. अशातच राज्याला पुरेशा लसीचा पुरवठा होत नसल्याने 1 मे पासून होणाऱ्या व्यापक लसीकरणाच्या मोहिमेमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. राज्यातील लसीकरणाचा वेग मंदावल्यास राज्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल असा इशारा काही तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे राज्यासमोरील चिंतेत वाढ झाली आहे.

राज्यात 1 मे पासून 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार होते. पण लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या आणि मृत्यू हे महाराष्ट्रात आहेत. त्यावर नियंत्रण ठेवायचं असेल तर सर्वांचं लसीकरण हाच पर्याय आहे. अशात लसीकरणाचा वेग मंदावल्यास कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊन तिसऱ्या लाटेला सामोरं जावं लागणार आहे असं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

रोज 8 लाख लसींची गरज, पुरवठा मात्र 1 लाख लसींचा
राज्यात आतापर्यंत 1.5 कोटी नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. राज्यातील नागरिकांचं सरसकट मोफत लसीकरण केलं जाणार आहे, असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र एवढ्या सगळ्या नागरिकांचं लसीकरण करण्यास 1 मे पासून आवश्यक लसी उपलब्ध होणार नाहीत. मे अखेरीपर्यंत लसी कदाचित मिळू शकतात. त्यावेळी लसीकरण सुरु होऊ शकतं, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. राज्याला दिवसाला 8 लाख डोसची गरज आहे. मात्र सध्या राज्याला 1 लाख डोस मिळत आहेत. लसी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या तर येत्या सहा महिन्यात हे लसीकरण पूर्ण करता येणे शक्य आहे. तेवढी सुविधा राज्यात उपलब्ध आहे, असं राजेश टोपे यांनी म्हटलं. 

राज्यात बुधावारी 63,309 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली असून 61,181 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 37,30,729 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.4 टक्के एवढे झाले आहे. राज्यात बुधवारी सर्वाधिक 985 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5 % एवढा आहे.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मैत्रिणीसाठी लावली जीवाची बाजी;  नांदेड जिल्ह्यात तीन युवतींचा बुडून मृत्यू, गावावर शोककळा
मैत्रिणीसाठी लावली जीवाची बाजी; नांदेड जिल्ह्यात तीन युवतींचा बुडून मृत्यू, गावावर शोककळा
'घाटकोपर दुर्घटना झाली नसती तर तुमचे डोळेच उघडले नसते', हायकोर्टानं सिडकोला खडसावलं 
'घाटकोपर दुर्घटना झाली नसती तर तुमचे डोळेच उघडले नसते', हायकोर्टानं सिडकोला खडसावलं 
T20 World Cup 2024 :  पाच खेळाडू चालले, तर टीम इंडिया जिंकणार टी20 विश्वचषक
T20 World Cup 2024 : पाच खेळाडू चालले, तर टीम इंडिया जिंकणार टी20 विश्वचषक
Jay Shah at Kolhapur : बीसीसीआयचे सचिव जय शाह कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला ABP Majha
Jay Shah at Kolhapur : बीसीसीआयचे सचिव जय शाह कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला ABP Majha
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sunil Tingre : पुणे पोर्शे अपघात प्रकरणात नाव असणारे सुनील टिंगरे देवदर्शनाला? ABP MajhaAbhijit Panse on Konkan MLC : मनसेचे उमेदवार की महायुतीचे? अभिजीत पानसे स्पष्टच बोलले! ABP MajhaChhagan Bhujbal : भाजपने 80-90 जागांचा शब्द दिलाय, मिळाल्याच पाहिजेत- भुजबळ आक्रमक!Jay Shah at Kolhapur : बीसीसीआयचे सचिव जय शाह कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मैत्रिणीसाठी लावली जीवाची बाजी;  नांदेड जिल्ह्यात तीन युवतींचा बुडून मृत्यू, गावावर शोककळा
मैत्रिणीसाठी लावली जीवाची बाजी; नांदेड जिल्ह्यात तीन युवतींचा बुडून मृत्यू, गावावर शोककळा
'घाटकोपर दुर्घटना झाली नसती तर तुमचे डोळेच उघडले नसते', हायकोर्टानं सिडकोला खडसावलं 
'घाटकोपर दुर्घटना झाली नसती तर तुमचे डोळेच उघडले नसते', हायकोर्टानं सिडकोला खडसावलं 
T20 World Cup 2024 :  पाच खेळाडू चालले, तर टीम इंडिया जिंकणार टी20 विश्वचषक
T20 World Cup 2024 : पाच खेळाडू चालले, तर टीम इंडिया जिंकणार टी20 विश्वचषक
Jay Shah at Kolhapur : बीसीसीआयचे सचिव जय शाह कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला ABP Majha
Jay Shah at Kolhapur : बीसीसीआयचे सचिव जय शाह कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला ABP Majha
Car Tips: एसयूव्‍ही कार घ्यायचा विचार करताय,  8 लाखांच्या आत बजेट, हे घ्या 5 बेस्ट पर्याय
Car Tips: एसयूव्‍ही कार घ्यायचा विचार करताय,  8 लाखांच्या आत बजेट, हे घ्या 5 बेस्ट पर्याय
अजब प्रेम की गजब कहानी... पतीच्या निधनानंतर काही वेळातच पत्नीचा मृत्यू, एकाच स्मशानात दोघांवर अंत्यसंस्कार
अजब प्रेम की गजब कहानी... पतीच्या निधनानंतर काही वेळातच पत्नीचा मृत्यू, एकाच स्मशानात दोघांवर अंत्यसंस्कार
घटकांबळे दलाल म्हणून काम करायचा, ब्लड सँपल कचऱ्यात फेकण्यासाठी हळनोरला 2.5 लाख, मास्टरमाईंड तावरेंसह तिघे कोठडीत
घटकांबळे दलाल म्हणून काम करायचा, ब्लड सँपल कचऱ्यात फेकण्यासाठी हळनोरला 2.5 लाख, मास्टरमाईंड तावरेंसह तिघे कोठडीत
मध्य रेल्वेवर 36 तासांचा मेगाब्लॉक, 1 आणि 2 जूनला 600 लोकल फेऱ्या रद्द होण्याची शक्यता
मध्य रेल्वेवर 36 तासांचा मेगाब्लॉक, 1 आणि 2 जूनला 600 लोकल फेऱ्या रद्द होण्याची शक्यता
Embed widget