एक्स्प्लोर

CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधणार, लसीकरण आणि लॉकडाऊनसंदर्भात बोलण्याची शक्यता

CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संध्याकाळी राज्यातील जनतेला संबोधित करणार असून मुख्यमंत्री काय घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत. लसीकरण असो, लॉकडाऊन असो किंवा सरकारची विविध धोरणं असोत, तसेच कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीशी लढण्याची सरकारची तयारी यासंदर्भात मुख्यमंत्री बोलण्याची शक्यता आहे. 

उद्या महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री जनतेला संबोधित करणार आहेत. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. अशातच आरोग्य यंत्रणेवरही प्रचंड ताण आलेला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊनही जारी करण्यात आला आहे. तसेच राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून धडा शिकून राज्य सरकारनं तिसऱ्या लाटेसाठीही तयारी सुरु केली आहे. यासर्व मुद्द्यांवर मुख्यमंत्री आज राज्यातील जनतेशी संवाद साधू शकतात. 

महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवला; 15 मेपर्यंत कडक लॉकडाऊन

कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र, तरीही रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. परिणामी राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. अनेक रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत आहे. ऑक्सिजन, औषधे, इंजेक्शन यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात आणखी 15 दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. 'ब्रेक द चेन' अंतर्गत या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आले असून राज्यांतर्गत प्रवासासाठी ई पासची गरज लागणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, फक्त अंत्यसंस्कार, मेडिकल इमर्जन्सी आणि अत्यावश्यक सेवेसाठीच प्रवास करता येणार, असल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे. 

तिसरी लाट येईल हे गृहीत धरून नियोजन करा, मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व  जिल्ह्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ उभारले जातील, आवश्यक औषधांचा साठा राहील याची अतिशय काटेकोरपणे काळजी घ्यावी असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंधाच्या काळात दुर्बल घटकांसाठीच्या  जाहीर पॅकेजप्रमाणे या घटकांना तात्काळ लाभ द्यावा. केवळ घोषणा नव्हे तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली दिसली पाहिजे अशा स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनांना दिल्या. आज ते कोविड  परिस्थितीसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेकडो इलेक्ट्रिक पोल कोसळले, पोलिस स्टेशनवरचे पत्रे उडाले; वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं मोठं नुकसान
शेकडो इलेक्ट्रिक पोल कोसळले, पोलिस स्टेशनवरचे पत्रे उडाले; वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं मोठं नुकसान
Watch : हार्दिक पांड्याला नताशा धोका देत होती? व्हायरल व्हिडीओनंतर चर्चेला उधाण
Watch : हार्दिक पांड्याला नताशा धोका देत होती? व्हायरल व्हिडीओनंतर चर्चेला उधाण
मैत्रिणीसाठी लावली जीवाची बाजी;  नांदेड जिल्ह्यात तीन युवतींचा बुडून मृत्यू, गावावर शोककळा
मैत्रिणीसाठी लावली जीवाची बाजी; नांदेड जिल्ह्यात तीन युवतींचा बुडून मृत्यू, गावावर शोककळा
'घाटकोपर दुर्घटना झाली नसती तर तुमचे डोळेच उघडले नसते', हायकोर्टानं सिडकोला खडसावलं 
'घाटकोपर दुर्घटना झाली नसती तर तुमचे डोळेच उघडले नसते', हायकोर्टानं सिडकोला खडसावलं 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM : 27 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सCity 60 SuperFast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवाग आढावा : 11 PM 27 May 2024TOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 09 PM : टॉप 100 न्यूज : 27 May 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM : 27 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेकडो इलेक्ट्रिक पोल कोसळले, पोलिस स्टेशनवरचे पत्रे उडाले; वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं मोठं नुकसान
शेकडो इलेक्ट्रिक पोल कोसळले, पोलिस स्टेशनवरचे पत्रे उडाले; वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं मोठं नुकसान
Watch : हार्दिक पांड्याला नताशा धोका देत होती? व्हायरल व्हिडीओनंतर चर्चेला उधाण
Watch : हार्दिक पांड्याला नताशा धोका देत होती? व्हायरल व्हिडीओनंतर चर्चेला उधाण
मैत्रिणीसाठी लावली जीवाची बाजी;  नांदेड जिल्ह्यात तीन युवतींचा बुडून मृत्यू, गावावर शोककळा
मैत्रिणीसाठी लावली जीवाची बाजी; नांदेड जिल्ह्यात तीन युवतींचा बुडून मृत्यू, गावावर शोककळा
'घाटकोपर दुर्घटना झाली नसती तर तुमचे डोळेच उघडले नसते', हायकोर्टानं सिडकोला खडसावलं 
'घाटकोपर दुर्घटना झाली नसती तर तुमचे डोळेच उघडले नसते', हायकोर्टानं सिडकोला खडसावलं 
T20 World Cup 2024 :  पाच खेळाडू चालले, तर टीम इंडिया जिंकणार टी20 विश्वचषक
T20 World Cup 2024 : पाच खेळाडू चालले, तर टीम इंडिया जिंकणार टी20 विश्वचषक
Jay Shah at Kolhapur : बीसीसीआयचे सचिव जय शाह कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला ABP Majha
Jay Shah at Kolhapur : बीसीसीआयचे सचिव जय शाह कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला ABP Majha
Car Tips: एसयूव्‍ही कार घ्यायचा विचार करताय,  8 लाखांच्या आत बजेट, हे घ्या 5 बेस्ट पर्याय
Car Tips: एसयूव्‍ही कार घ्यायचा विचार करताय,  8 लाखांच्या आत बजेट, हे घ्या 5 बेस्ट पर्याय
अजब प्रेम की गजब कहानी... पतीच्या निधनानंतर काही वेळातच पत्नीचा मृत्यू, एकाच स्मशानात दोघांवर अंत्यसंस्कार
अजब प्रेम की गजब कहानी... पतीच्या निधनानंतर काही वेळातच पत्नीचा मृत्यू, एकाच स्मशानात दोघांवर अंत्यसंस्कार
Embed widget