कृषी बातम्या

Registration Process | शेतकरी मित्रांनो, ही नोंदणी प्रक्रिया त्वरित पूर्ण करा; अन्यथा होईल नुकसान, राहिला फक्त 1 दिवस…

Registration Process | Farmer friends, complete this registration process immediately; Otherwise there will be damage, only 1 day left

Registration Process | इ-पीक पाहणीचा लाखों शेतकऱ्यांना (farmers) फायदा झाला. खरीब हंगामात तब्बल 98 लाख शेतकऱ्यांनी (farmers) पिकांच्या (crop) नोंदणी केल्या होत्या. आता रब्बी हंगामात देखील पिकांची नोंदणी करणे गरजेचे आहे. रब्बी हंगामात पिकांच्या (crop) नोंदणी करण्यासाठी शेवटची तारीख 15 फेब्रुवारी आहे. शेतकऱ्यांकडे (farmers) फक्त 1 दिवस राहिला आहे.

वाचा –दिलासादायक; ९० टक्के अनुदानावर ग्रामीण महिला व मुलींना शिलाई मशिन, अर्ज सादर करावयाची ही आहे शेवटची तारीख..

इ पीक पाहणी अशी करा –

1) शेतकरी मित्रांनो, इ-पीक पाहणी हे अँप प्लेस्टोअर वरून डाऊनलोड करा. त्यानंतर खातेदार नोंदणी करून घ्या.
2) जिल्हा, तालुका व गावाची निवड करा. खातेदारमध्ये
पहिले नाव, मधले नाव, अडनांव आणि गट क्रमांक टाका. गट क्रमांक टाकल्यानंतर तुमचे नाव येईल. पुढे मोबाईल नंबर टाका. त्यानंतर मोबाईल वर SMS द्वारे पासवर्ड येईल, हा पासवर्ड अँप ला लागणार आहे. लक्षात ठेवा.
3) पुढे अँप ओपन करा. खातेदार म्हणजे तुमचे नाव निवडा.
4) पासवर्ड टाका.
5) पुढे परीचय मध्ये तुमचा फोटो अपलोड करा. व माहिती भरा.

वाचा- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रांच्या खरेदीसाठी शून्य शुल्कमध्ये कर्ज उपलब्ध, SBl ने उचललं मोठं पाऊल… 🚜

पुढे पिकांची नोंदणी अशी करा –

• होम वर जावा. पिकाची माहिती नोंदवा असा एक फॉर्म येईल. त्यामध्ये खातेक्रमांक, गट क्रमांक, जमिनीचे क्षेत्र हे हेक्टरमध्ये भरा.
• यानंतर हंगाम निवडा. पुढे पेरणी क्षेत्र टाका.
• पुढे पीक निवडा. व या पिकाचे क्षेत्र निवडा.
• सिंचन व ठिबक पद्धत निवडा.
• पिकाच्या लागवडीची तारीख नोंद करा.


• पुढे कॅमेरा पर्याय येईल यातून फोटो काढा व माहिती भरा व फॉर्म सबमिट करा.
• सबमिट केल्यानंतर पुन्हा होम वरती या.
• तुम्ही भरलेली माहिती पाहायची असेल तर पुन्हा पिकाची नोंदणी यावर जा. पुढे पिकाची नोंदणी वर क्लीक करा.
• तुम्ही भरलेली माहिती दिसेल. ती माहिती सर्वरला पाठविण्यासाठी अपलोड वर क्लीक करा. पुढे आलेल्या दोन ऑप्शनवरून तुम्ही भरलेली माहिती पाहू शकता.
• शेवटी पीक माहितीवर क्लीक करून माहिती अपलोड करा. अशाप्रकारे इ-पीक नोंदणी करू शकता.

हे ही वाचा –

सरकारच्या बिनव्याजी कर्ज योजनेचा घ्या लाभ; जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना तब्बल 60 कोटी व्याज सवलत…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिव जयंतीची नियमावली केली जाहीर, गृहविभागाच्या प्रस्तावाला मिळाली मान्यता..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button