एक्स्प्लोर

Oxygen Express | ऑक्सिजनच्या तातडीच्या वाहतुकीसाठी राज्यातून 'ऑक्सिजन एक्सप्रेस' धावणार, ग्रीन कॉरिडोर तयार केला जाणार

ऑक्सिजनच्या तातडीच्या वाहतुकीसाठी रेल्वेची ऑक्सिजन एक्सप्रेस धावणार आहे.  उद्या म्हणजेच 19 एप्रिलला कळंबोली स्टेशनवरून विशाखापट्टणमच्या दिशेने हीऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना होणार आहे.

नवी दिल्ली : राज्यातील ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी आता ऑक्सिजन एक्स्प्रेस धावणार आहे. ऑक्सिजनच्या तातडीच्या वाहतुकीसाठी रेल्वेची ऑक्सिजन एक्सप्रेस धावणार आहे.  उद्या म्हणजेच 19 एप्रिलला कळंबोली स्टेशनवरून विशाखापट्टणमच्या दिशेने हीऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना होणार आहे. दहा टँकर महाराष्ट्रातून जाणार आहेत. 

लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलेंडर नेण्यासाठी रेल्वेची पूर्ण तयारी झाली आहे. ऑक्सिजन एक्सप्रेसच्या वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडोर तयार केला जाणार आहे. कळंबोली रेल्वे स्टेशनहून दहा रिकामे टँकर्स वायझॅक, जमशेदपूर, रौरकेला, बोकारो येथे रवाना होणार आहेत. तेथून ऑक्सिजन भरुन पुन्हा ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्रात दाखल होणार आहे. 

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य सरकारने लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) टँकर रेल्वेने हलवू शकतात का याचा शोध घेण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे संपर्क साधला होता. रेल्वेने तातडीने एलएमओ वाहतुकीची तांत्रिक शक्यता शोधून काढली. फ्लॅट वॅगन्सवर ठेवलेल्या रोड टँकरसह रोरो सेवेद्वारे लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची वाहतूक करावी लागेल, असं रेल्वेने सुचवलं.

17 एप्रिल रोजी रेल्वे बोर्डाचे अधिकारी,  राज्य परिवहन आयुक्त आणि उद्योग प्रतिनिधी यांच्यात लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या वाहतुकीशी संबंधित मुद्द्यांवर बैठक पार पडली. टँकर हे परिवहन आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडून दिले जातील, असा निर्णय झाला. रिकामे टँकर कळंबोली / बोईसर रेल्वे स्थानकांमधून ऑक्सिजन लोड करण्यासाठी वायझॅक आणि जमशेदपूर / रौरकेला / बोकारो येथे पाठविले जातील.

रेल्वे मार्गावर काही ठिकाणी रोड ओव्हर ब्रिज आणि ओव्हर हेड इक्विपमेंट्सच्या उंचीच्या मर्यादेमुळे अडचणी येण्याची शक्यता होती. त्यामुळे रस्ते टँकरच्या विविध वैशिष्ट्यांपैकी, रोड टँकर टी 1618 चे मॉडेल लावले जाणे शक्य असल्याचे आढळले. हे टँकरर 1290 मिमी उंचीसह सपाट वॅगनवर ठेवले जाणार आहेत. वाहतुकीच्या सर्व चाचण्या रेल्वेकडून घेण्यात आल्या आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prajwal Revanna : मोठी बातमी : महिलांच्या शोषणाचे आरोप असलेला प्रज्ज्वल रेवण्णा अखेर समोर, व्हिडीओ पोस्ट करत सविस्तर सांगितलं!
मोठी बातमी : महिलांच्या शोषणाचे आरोप असलेला प्रज्ज्वल रेवण्णा अखेर समोर, व्हिडीओ पोस्ट करत सविस्तर सांगितलं!
शिक्षक मतदारसंघात जे आम्हाला पाठिंबा देतील, त्यांनाच पाठिंबा देणार; कपिल पाटील यांचा ठाकरे गटाला इशारा
शिक्षक मतदारसंघात जे आम्हाला पाठिंबा देतील, त्यांनाच पाठिंबा देणार; कपिल पाटील यांचा ठाकरे गटाला इशारा
48 पैकी 21 मतदारसंघात मतदान घटलं, ठाकरे की शिंदे, काका की दादा, कुणाला धक्का, कुणाला फायदा?
48 पैकी 21 मतदारसंघात मतदान घटलं, ठाकरे की शिंदे, काका की दादा, कुणाला धक्का, कुणाला फायदा?
GOAT Record Breaking Deal:  थलापती विजयच्या 'या' चित्रपटाने रिलीज आधीच कमावले 200 कोटी, रचला नवा विक्रम
थलापती विजयच्या 'या' चित्रपटाने रिलीज आधीच कमावले 200 कोटी, रचला नवा विक्रम
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 27 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRahul Gandhi Stage Collapse : स्टेज खचला पण अनर्थ टळला... राहुल गांधीच्या सभेत काय झालं?Majha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 27May 2024Sushma Andhare on Ajay Taware : किडनी रॅकेट ते ललित पाटील, पुणे अपघातातील डॉक्टरवर अंधारेंचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prajwal Revanna : मोठी बातमी : महिलांच्या शोषणाचे आरोप असलेला प्रज्ज्वल रेवण्णा अखेर समोर, व्हिडीओ पोस्ट करत सविस्तर सांगितलं!
मोठी बातमी : महिलांच्या शोषणाचे आरोप असलेला प्रज्ज्वल रेवण्णा अखेर समोर, व्हिडीओ पोस्ट करत सविस्तर सांगितलं!
शिक्षक मतदारसंघात जे आम्हाला पाठिंबा देतील, त्यांनाच पाठिंबा देणार; कपिल पाटील यांचा ठाकरे गटाला इशारा
शिक्षक मतदारसंघात जे आम्हाला पाठिंबा देतील, त्यांनाच पाठिंबा देणार; कपिल पाटील यांचा ठाकरे गटाला इशारा
48 पैकी 21 मतदारसंघात मतदान घटलं, ठाकरे की शिंदे, काका की दादा, कुणाला धक्का, कुणाला फायदा?
48 पैकी 21 मतदारसंघात मतदान घटलं, ठाकरे की शिंदे, काका की दादा, कुणाला धक्का, कुणाला फायदा?
GOAT Record Breaking Deal:  थलापती विजयच्या 'या' चित्रपटाने रिलीज आधीच कमावले 200 कोटी, रचला नवा विक्रम
थलापती विजयच्या 'या' चित्रपटाने रिलीज आधीच कमावले 200 कोटी, रचला नवा विक्रम
आता हद्द झाली, अग्रवालविरुद्ध महिलाच पुढे आली; 10 एकर जमीन हडपली, पुण्यात तिसरी तक्रार
आता हद्द झाली, अग्रवालविरुद्ध महिलाच पुढे आली; 10 एकर जमीन हडपली, पुण्यात तिसरी तक्रार
Prashant Damle Gela Madhav Kunikade: 'गेला माधव कुणीकडे'  नाटकाचे 19 वर्षांनी रंगभूमीवर कमबॅक; 15 जूनला शुभारंभ, तिकीट कुठं बुक करणार?
'गेला माधव कुणीकडे' नाटकाचे 19 वर्षांनी रंगभूमीवर कमबॅक; 15 जूनला शुभारंभ, तिकीट कुठं बुक करणार?
Ashwini Kasar : ''मराठीत बोलली तर खटकलं, धमकीच देण्यात आली''; अभिनेत्रीला लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक अनुभव
''मराठीत बोलली तर खटकलं, धमकीच देण्यात आली''; अभिनेत्रीला लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक अनुभव
Kalyani Nagar accident : मी गप्प बसणार नाही, सगळ्यांची नावं उघड करेन, डॉ. अजय तावरेचा इशारा
Kalyani Nagar accident : मी गप्प बसणार नाही, सगळ्यांची नावं उघड करेन, डॉ. अजय तावरेचा इशारा
Embed widget