एक्स्प्लोर

संदीप पाठकच्या संकल्पनेतून माजलगावात रक्तदान शिबीर, 100 बाटल्या रक्तसंकलन करण्याचं उद्दिष्ट

कोरोनाचं सावट लक्षात घेऊन या काळात असलेली रक्ताची गरज समजून संदीप पाठकने रक्तदान केलं. त्याच्या संकल्पनेतून बीडच्या माजलगावात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. 100 बाटल्या रक्त संकलन करण्याचं उद्दिष्ट आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग भारतभर पाहायला मिळतो आहे. अनेक कलाकार आता कोरोनाच्या या लढाईत उतरले आहेत. काहींनी सोशल मीडियाची मदत घेऊन कोरोनासंबंधीच्या बातम्या लोकांना सांगायला सुरुवात केली आहे. मदत इकडून तिकडे पोहोचवायला सुरुवात केली आहे. तर काही कलाकारांनी आपआपल्या परीने खारीचा वाटा उचलायला सुरुवात केली आहे. संदीप पाठक हा त्यापैकी एक. 

संदीप पाठक या कलाकाराला आपण अनेक चित्रपट, नाटकांतून पाहिलं. वऱ्हाड निघालंय लंडनला या नाटकाचे प्रयोग तो करतोच. पण रंगा पतंगा, एक हजाराची नोट अशा अनेक चित्रपटांमधून तो दिसला आहे. म्हणूनच त्याचा असा एक चाहतावर्ग तयार झाला आहे. कोरोनाचं सावट लक्षात घेऊन या काळात असलेली रक्ताची गरज समजून संदीपने सोमवारी रक्तदान केलं. त्यासंबंधी त्याने एक पोस्ट करुन ती सोशल मीडियावर टाकली. आपण रक्तदान करतो आहोतच. पण लोकांनीही रक्तदानासाठी पुढे यावं असं आवाहन त्याने केलं. पण इतकं करुन तो थांबला नाही. 

संदीप पाठकच्या संकल्पनेतून माजलगावात रक्तदान शिबीर, 100 बाटल्या रक्तसंकलन करण्याचं उद्दिष्ट

रक्तदानाचा हा संकल्प त्याने आपल्या गावी म्हणजे बीड जिल्ह्यातल्या माजलगाव या तालुक्यात करायचं ठरवलं आहे. संदीप सध्या मुंबईत आहे. पण माजलगावात त्याचा मोठा मित्र परिवार आहे. माजलगावात काही नड असेल किंवा कुणाला कशाची गरज असेल तर जीव माजलगांव आणि लव माजलगांव असे दोन तरुणाईचे ग्रुप आहेत. ही मुलं तालुक्यासाठी सकारात्मक काम करत असतात. संदीपने रक्तदान केल्याचे फोटो, व्हिडीओ तिथल्या ग्रुपवर टाकले आणि या तालुक्यात 100 बाटल्या रक्त संकलन करण्याचा संकल्प माजलगावकरांना बोलून दाखवला. 

संदीप पाठकच्या संकल्पनेतून माजलगावात रक्तदान शिबीर, 100 बाटल्या रक्तसंकलन करण्याचं उद्दिष्ट

संदीपची ही योजना तिथल्या तरुणाईला आवडली. जीव माजलगाव आणि लव माजलगांव असे ग्रुप या कामाला लागले आहेत. याबद्दल बोलताना संदीप म्हणाला, "माजलगाव हा तालुका जरी असला तरी तिथे रक्तपेढी नाही. प्लाझ्मा वगैरे तर लांबची बात. शिवाय, व्हेंटिलेटरची सुविधा नाही. ऑक्सिजनची सुविधा नाही. रक्तदान शिबीर जरी घेतलं तरी बीडहून रक्तसंकलनालाठी डॉक्टरांची टीम येते. सर्व बाटल्या घेऊन ती गाडी बीडला जाते. तिथल्या रक्तपेढीत ते ठेवलं जातं आणि तिथून आवश्यक ठिकाणी त्याचा पुरवठा होतो. मी रक्तदान केलं आहेच. पण रक्ताची खूप गरज आहे सध्या. यातून ही संकल्पना उदयाला आली. या योजनेला प्रतिसादही चांगला आहे. 30 एप्रिलला माजलगावात हे शिबीर होत आहे. 100 बाटल्यांचं आमचं उद्दिष्ट आहे. सध्या 80 दाते तयार झाले आहेत. सध्याच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्याला एकत्रित पाऊल उचलायला हवं. माजलगावातल्या लोकांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. माजलगांवच्या मां वैष्णवी मंगल कार्यालय इथे हे रक्तदान शिबीर होणार आहे."

संदीप पाठकच्या संकल्पनेतून माजलगावात रक्तदान शिबीर, 100 बाटल्या रक्तसंकलन करण्याचं उद्दिष्ट

संदीपच्या या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता किमान सव्वाशे ते दीडशे बाटल्या रक्त संकलित व्हावं अशी अपेक्षा आहे. केवळ माजलगावच नव्हे, तर परळी, आंबेजोगाई अशा छोट्या छोट्या ठिकाणीही अशी शिबीरं व्हावीत आणि त्यातून रक्तसंकलन व्हावं अशी अपेक्षा संदीपची आहे. आपण रक्तदान करतानाच परिस्थितीचं गांभीर्य ओळखून आपल्यासह इतरांनाही या मोहिमेत सहभागी करुन घेण्याचा संदीपचा प्रयत्न खरोखरीच कौतुकास्पद म्हणावा लागेल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मैत्रिणीसाठी लावली जीवाची बाजी;  नांदेड जिल्ह्यात तीन युवतींचा बुडून मृत्यू, गावावर शोककळा
मैत्रिणीसाठी लावली जीवाची बाजी; नांदेड जिल्ह्यात तीन युवतींचा बुडून मृत्यू, गावावर शोककळा
'घाटकोपर दुर्घटना झाली नसती तर तुमचे डोळेच उघडले नसते', हायकोर्टानं सिडकोला खडसावलं 
'घाटकोपर दुर्घटना झाली नसती तर तुमचे डोळेच उघडले नसते', हायकोर्टानं सिडकोला खडसावलं 
T20 World Cup 2024 :  पाच खेळाडू चालले, तर टीम इंडिया जिंकणार टी20 विश्वचषक
T20 World Cup 2024 : पाच खेळाडू चालले, तर टीम इंडिया जिंकणार टी20 विश्वचषक
Jay Shah at Kolhapur : बीसीसीआयचे सचिव जय शाह कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला ABP Majha
Jay Shah at Kolhapur : बीसीसीआयचे सचिव जय शाह कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला ABP Majha
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Abhijit Panse on Konkan MLC : मनसेचे उमेदवार की महायुतीचे? अभिजीत पानसे स्पष्टच बोलले! ABP MajhaChhagan Bhujbal : भाजपने 80-90 जागांचा शब्द दिलाय, मिळाल्याच पाहिजेत- भुजबळ आक्रमक!Jay Shah at Kolhapur : बीसीसीआयचे सचिव जय शाह कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला ABP MajhaMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 08 PM : 27 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मैत्रिणीसाठी लावली जीवाची बाजी;  नांदेड जिल्ह्यात तीन युवतींचा बुडून मृत्यू, गावावर शोककळा
मैत्रिणीसाठी लावली जीवाची बाजी; नांदेड जिल्ह्यात तीन युवतींचा बुडून मृत्यू, गावावर शोककळा
'घाटकोपर दुर्घटना झाली नसती तर तुमचे डोळेच उघडले नसते', हायकोर्टानं सिडकोला खडसावलं 
'घाटकोपर दुर्घटना झाली नसती तर तुमचे डोळेच उघडले नसते', हायकोर्टानं सिडकोला खडसावलं 
T20 World Cup 2024 :  पाच खेळाडू चालले, तर टीम इंडिया जिंकणार टी20 विश्वचषक
T20 World Cup 2024 : पाच खेळाडू चालले, तर टीम इंडिया जिंकणार टी20 विश्वचषक
Jay Shah at Kolhapur : बीसीसीआयचे सचिव जय शाह कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला ABP Majha
Jay Shah at Kolhapur : बीसीसीआयचे सचिव जय शाह कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला ABP Majha
Car Tips: एसयूव्‍ही कार घ्यायचा विचार करताय,  8 लाखांच्या आत बजेट, हे घ्या 5 बेस्ट पर्याय
Car Tips: एसयूव्‍ही कार घ्यायचा विचार करताय,  8 लाखांच्या आत बजेट, हे घ्या 5 बेस्ट पर्याय
अजब प्रेम की गजब कहानी... पतीच्या निधनानंतर काही वेळातच पत्नीचा मृत्यू, एकाच स्मशानात दोघांवर अंत्यसंस्कार
अजब प्रेम की गजब कहानी... पतीच्या निधनानंतर काही वेळातच पत्नीचा मृत्यू, एकाच स्मशानात दोघांवर अंत्यसंस्कार
घटकांबळे दलाल म्हणून काम करायचा, ब्लड सँपल कचऱ्यात फेकण्यासाठी हळनोरला 2.5 लाख, मास्टरमाईंड तावरेंसह तिघे कोठडीत
घटकांबळे दलाल म्हणून काम करायचा, ब्लड सँपल कचऱ्यात फेकण्यासाठी हळनोरला 2.5 लाख, मास्टरमाईंड तावरेंसह तिघे कोठडीत
मध्य रेल्वेवर 36 तासांचा मेगाब्लॉक, 1 आणि 2 जूनला 600 लोकल फेऱ्या रद्द होण्याची शक्यता
मध्य रेल्वेवर 36 तासांचा मेगाब्लॉक, 1 आणि 2 जूनला 600 लोकल फेऱ्या रद्द होण्याची शक्यता
Embed widget