ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Gold Silver Price। सोन्याचे दर 53 हजाराच्या पार, चांदीही तेजीत; पहा नवे भाव

Gold Silver Price. Gold price crosses 53,000, silver also rises; See new prices

Gold Silver Price। रशिया-युक्रेनमधील युद्ध (Russia Ukraine War) सुरूच आहे. या युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय बाजारपेठेवरही पडसाद उमटताना दिसतायत. याच युद्धाचा परिणाम म्हणून सोन्या-चांदीच्या किंमतीतही सातत्याने अस्थिरता निर्माण झाली आहे.

सोने आणि चांदी तेजीत

आज (4 मार्च) रोजी सोन्या-चांदीच्या (Gold Silver Price) दरात पुन्हा वाढ झाली आहे. भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या (Gold) दरात 490 रुपयांनी तर चांदीच्या (Silver) दरात 50 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे. यानुसार, सोन्याचा दर 53,000 हजार प्रति दहा ग्रॅम आणि चांदीचा दर आज 68,600 प्रति किलोवर पोहोचला आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचा फटका

सोने आणि चांदी या दोन्ही धातूंच्या किंमतीत वाढ सुरूच आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्याच्या किंमतीवर परिणाम होत आहे. गेल्या दहा दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. इतकंच नाही तर, येत्या काळात सोने 55 हजारांचा दर ओलांडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे सध्या सोने 53 हजार रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पुढे पोहोचले आहे.

वाचा-

युद्धाचा भारतीय बाजारपेठेवरही परिणाम

सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याने भारतीय बाजारपेठेवरही झाला आहे. रशिया युक्रेनमधील युद्ध सुरु होताच आर्थिक व्यवस्थादेखील कोलमडू लागली आहे. सोन्याच्या दरात अचानक वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 47 हजारांवर होता. एका आठवड्यात सोन्याचा दर आज 53 हजारांच्या पुढे गेला आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button