एक्स्प्लोर

सिडकोकडून घर लाभार्थ्यांना मोठा दिलासा; 31 जुलैपर्यंत पैसे भरण्यास मुदतवाढ, 16 महिन्यांची लेट फी रद्द

सिडकोने घर लाभार्थ्यांना दिलासा दिला आहे. घराचा एकही हफ्ता न भरलेल्या लोकांचं घर रद्द न करता, त्यांना 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 16 महिन्यांची लागलेली लेट फी सुद्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई : कोरोनाची स्थिती पाहता लोकांना दिलासा देण्यासाठी सिडकोने घर लाभार्थ्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोने 2018-19 मध्ये 25 हजार घरांची लॉटरी काढली होती. मात्र कोरोनामुळे बहुतांश लोकांना घर मिळूनही पैसे भरता आले नव्हते. पहिला हफ्ताही न भरल्याने अनेकांवर लॉटरीमध्ये लागलेले घर गमावण्याची वेळ आली होती. मात्र कोरोनामुळे लोकांची आर्थिक स्थिती खराब झाली. परंतु लोकांना त्यांच्या स्वप्नातील घरात राहायला जाता यावं यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. घराचा एकही हफ्ता न भरलेल्या लोकांचं घर रद्द न करता, त्यांना 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचबरोबर ज्यांचे काही हफ्ते बाकी आहेत, त्यांनाही 31 जुलैपर्यंत वेळ मिळणार आहे. 16 महिन्यांची लागलेली लेट फी सुद्धा रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यामुळे कोरोना काळात आर्थिक कंबरडं मोडलं असताना, सिडकोने रद्द केलेल्या लेट फीमुळे घर लाभार्थ्यांचे लाखो रुपये वाचणार आहेत. 

महाराष्ट्र शासनाच्या "सर्वांसाठी घरे" धोरणांतर्गत सिडकोतर्फे महागृहनिर्माण योजना 2018-19 अंतर्गत घरांची घोषणा करण्यात आली होती. नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या 5 नोडमध्ये सुमारे 25 हजार घरं प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी जाहीर करण्यात आली होती. या योजनेची सोडत पार पडली. यशस्वी अर्जदारांच्या कागदपत्रांची छाननी करुन पात्र ठरलेल्या अर्जदारांना सदनिकेच्या किंमतीच्या रकमेचा ठराविक हफ्त्यांमध्ये भरणा करण्यासाठी वेळापत्रक देण्यात आलं होतं. परंतु त्यानंतर काही अर्जदारांनी एकाही हफ्त्याचा भरणा न केल्याचं तर काही अर्जदारांचे हफ्ते थकित असल्याचं आढळून आलं. या अर्जदारांच्या विनंतीवरुन सदनिकेचे हफ्ते भरण्यासाठी 28 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु या अंतिम दिनांकापर्यंतही काही अर्जदार हफ्ते भरण्यास असमर्थ ठरले होते. 

महामंडळाच्या गृहनिर्माण योजनेतील तरतुदींनुसार विहित मुदतीत हफ्ते न भरणाऱ्या अर्जदारांचे वाटपपत्र रद्द होऊ शकतं. परंतु कोविड-19 ची महामारी आणि त्यानंतर लागू केलेला लॉकडाऊन यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. तसंच या योजनेतील सर्व अर्जदार हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणं, या बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन सिडको महामंडळाने सदनिकेचा एकही हफ्ता न भरलेल्या आणि उर्वरित हफ्ते थकित असणाऱ्या संबंधित अर्जदारांना हफ्ते भरण्यासाठी 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्याचं निर्णय घेतला. तसंच 25 मार्च 2020 ते 31 जुलै 2021 या कालावधीत थकित हफ्त्यांवर लागू होणारी लेट फी माफ करणार असल्याचंही जाहीर केलं. या अंतिम मुदतीपर्यंत संबंधित अर्जदारांनी थकित हफ्त्यांचा भरणा करावा लागणार आहे. या निर्णयामुळे संबंधित अर्जदारांना निश्चितच दिलासा मिळाला आहे. 

यासाठी संबंधित अर्जदारांनी सिडकोच्या www.cidco.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट देऊन, त्यावरील Online Payment या टॅबचा वापर करुन आपल्या थकित हफ्त्यांच्या संपूर्ण रकमेचा भरणा करायचा आहे. दिलेल्या मुदतवाढीचा संबंधित अर्जदारांनी लाभ घ्यावा, असं आवाहन सिडकोतर्फे करण्यात आलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sonia Doohan: शरद पवारांच्या 'लेडी जेम्स बाँड' मागच्या दरवाजाने अजित पवारांच्या बैठकीला, दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित!
शरद पवारांच्या 'लेडी जेम्स बाँड' मागच्या दरवाजाने अजित पवारांच्या बैठकीला, दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित!
Pune Porsche Car Accident : धंगेकरांनी लाज काढली, सुषमा अंधारेंनी हप्तेखोरीचे रेटकार्ड वाचून दाखवलं, एक्साईज अधिकारी गपचूप ऐकत उभे राहिले!
धंगेकरांनी लाज काढली, सुषमा अंधारेंनी हप्तेखोरीचे रेटकार्ड वाचून दाखवलं, एक्साईज अधिकारी गपचूप ऐकत उभे राहिले!
Pune Pubs: रवींद्र धंगेकर, सुषमा अंधारे पुणे एक्साईज कार्यालयात, अधिकाऱ्यांना म्हणाले, तुम्हाला लाज वाटत नाही का, हप्तेखोरीची यादी वाचून दाखवली!
रवींद्र धंगेकर एक्साईजच्या अधिकाऱ्यांना म्हणाले, तुम्हाला लाज वाटत नाही का, हप्तेखोरीची यादी वाचून दाखवली!
Amit Shah : शरद पवारांनी ठाकरेंना आमच्यापासून तोडले; हा खेळ ज्यांनी सुरु केला त्यांनीच तो संपवावा; अमित शाहांचं सूचक वक्तव्य
शरद पवारांनी ठाकरेंना आमच्यापासून तोडले; हा खेळ ज्यांनी सुरु केला त्यांनीच तो संपवावा; अमित शाहांचं सूचक वक्तव्य
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 12 AM : 27  May 2024 : Maharashtra NewsSSC Board Result 2024 : दहावीच्या निकालात मुलींचाच डंका, बोर्डाची संपूर्ण पत्रकार परिषद | PuneChanda Te Banda : चांदा ते बांदा महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 27 May 2024Pune Car Accident Case : ब्लड सॅम्पल कचरा कुंडीत, धनाढ्य  बापाच्या लेकासाठी 'ससून'मध्ये कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonia Doohan: शरद पवारांच्या 'लेडी जेम्स बाँड' मागच्या दरवाजाने अजित पवारांच्या बैठकीला, दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित!
शरद पवारांच्या 'लेडी जेम्स बाँड' मागच्या दरवाजाने अजित पवारांच्या बैठकीला, दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित!
Pune Porsche Car Accident : धंगेकरांनी लाज काढली, सुषमा अंधारेंनी हप्तेखोरीचे रेटकार्ड वाचून दाखवलं, एक्साईज अधिकारी गपचूप ऐकत उभे राहिले!
धंगेकरांनी लाज काढली, सुषमा अंधारेंनी हप्तेखोरीचे रेटकार्ड वाचून दाखवलं, एक्साईज अधिकारी गपचूप ऐकत उभे राहिले!
Pune Pubs: रवींद्र धंगेकर, सुषमा अंधारे पुणे एक्साईज कार्यालयात, अधिकाऱ्यांना म्हणाले, तुम्हाला लाज वाटत नाही का, हप्तेखोरीची यादी वाचून दाखवली!
रवींद्र धंगेकर एक्साईजच्या अधिकाऱ्यांना म्हणाले, तुम्हाला लाज वाटत नाही का, हप्तेखोरीची यादी वाचून दाखवली!
Amit Shah : शरद पवारांनी ठाकरेंना आमच्यापासून तोडले; हा खेळ ज्यांनी सुरु केला त्यांनीच तो संपवावा; अमित शाहांचं सूचक वक्तव्य
शरद पवारांनी ठाकरेंना आमच्यापासून तोडले; हा खेळ ज्यांनी सुरु केला त्यांनीच तो संपवावा; अमित शाहांचं सूचक वक्तव्य
Pune Porsche Car Accident : ससून डाॅक्टर की राजरोस पांढरपेशा मवाल्यांचा अड्डा? तावरे आणि हळनोरनं दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन पोराचे सॅम्पल घेतले कचऱ्यात फेकले
ससून डाॅक्टर की राजरोस पांढरपेशा मवाल्यांचा अड्डा? तावरे आणि हळनोरनं दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन पोराच्या रक्ताचे सॅम्पल घेतले कचऱ्यात फेकले
Amitabh Bachchan on Kavya Maran : माय डिअर... काव्या मारनचे अश्रू पाहून बिग बींचं हृदय पाघळलं; म्हणाले...
माय डिअर... काव्या मारनचे अश्रू पाहून बिग बींचं हृदय पाघळलं; म्हणाले...
Bollywood Iconic Movies : 'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे' ते 'हेरा फेरी'; बॉलिवूडचे 'हे' पाच आयकॉनिक चित्रपट आजही करतात प्रेक्षकांच्या मनावर राज्य!
'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे' ते 'हेरा फेरी'; बॉलिवूडचे 'हे' पाच आयकॉनिक चित्रपट आजही करतात प्रेक्षकांच्या मनावर राज्य!
Pune Car Accident Case : ब्लड सॅम्पल कचरा कुंडीत, धनाढ्य  बापाच्या लेकासाठी 'ससून'मध्ये कट
ब्लड सॅम्पल कचरा कुंडीत, धनाढ्य बापाच्या लेकासाठी 'ससून'मध्ये कट
Embed widget