ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Richest CM| ‘हे’आहेत देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे कितव्या क्रमांकावर?

Richest CM| राजकारण आणि श्रीमंती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. राजकारणात उतरायचं तर पैसा हवाच. पैशाशिवाय काहीच चालत नाही. काही अपवादही असतातच. अनेक नट-नट्या, क्रिकेटपटू यांच्या संपत्ती विषयी चर्चा आपण ऐकत असतो. पण राजकारण्यांच्या संपत्तीचं काय? याबद्दल गूढच असतं. मात्र आता एक यादी समोर आली आहे. यानुसार भारतातील राज्यांचे काही मुख्यमंत्री हे देखील गर्भश्रीमंत आहेत. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म या संस्थेनं ही यादी जाहीर केली आहे. यामध्ये देशातील 30 मुख्यमंत्र्यांपैकी 29 मुख्यमंत्री हे कोट्यधीश असल्याचं समोर आलं आहे. निवडणुकीदरम्यान दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये 28 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीचा तपशील देण्यात आला आहे.

देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री

देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत आंध्र प्रदेशचे जगन मोहन रेड्डी. यांच्याकडे तब्बल 510.38 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे आणि त्यांच्या नावे कर्ज आहे सुमारे दोन कोटी रुपयांचं. दुसऱ्या क्रमांकावर आहेत अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू . त्यांच्याकडे 163.50 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. तिसर्‍या क्रमांकावर आहेत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक. यांच्या नावावर 63.87 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

सर्वात कमी संपत्ती कुणाकडे

देशातील सर्वात कमी श्रीमंत असलेल्या मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी. त्यांच्याकडे संपत्ती आहे 15 लाख रुपयांची. ही संपत्ती त्यांनी स्वतः कमवल्याचं सांगण्यात आलं आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे कमी संपत्ती असलेले मुख्यमंत्री आहेत. विजयन यांच्याकडे 1.18 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर हरियाणाचे मुख्यमंत्री आहेत मनोहर लाल खट्टर. त्यांच्या नावे 1.27 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

एकनाथ शिंदेंकडे किती संपत्ती

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील कोट्यधीश आहेत. ते या यादीत अकराव्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या नावावर 11 कोटी 56 लाख 12 हजार रुपये इतकी संपत्ती आहे. तसंच सर्वाधिक मालमत्तेच्या बाबतीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 26व्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे 1.54 कोटी रुपयांची संपत्ती आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे तीन कोटी रुपयांहून अधिक संपत्ती आहे तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे 3.44 कोटी रुपयांची संपत्ती आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे 1.97 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत. एडीआर रिपोर्टनुसार, देशातील 11 राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत आणि ते सर्व कोट्यधीश आहेत. 

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button