भव्य सायकल रॅली २०२३
G 20 निमित्त शनिवार दि. १० जून २०२३ रोजी भव्य सायकल रॅलीचे आयोजन केले आहे.  
              
रॅलीमार्ग : 
                                                                                                                                                                                 
मनपा भवन - मॉडर्न कॅफे - जंगली महाराज रोड - अलका टॉकीज चौक - टिळक रोड - अभिनव कॉलेज - बाजीराव रोड - मनपा भवन.                                                                                                                                                                                        
सायकल रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी खालीलप्रमाणे फॉर्म भरावा. सर्वांना टि-  शर्ट, टोपी, मेडल देण्यात येणार आहे. प्रवेश विनामूल्य. काही शंका असल्यास खालील क्रमांकावर संपर्क करावा.
          
संपर्क क्रमांक : ९६८९९३१०९४ / ८६६८७१२३८२ / ९६८९९३७२७५ / ९९२१९७६९३८ / ७०२०९७३९५४ / ८४५९३२६६८४ / ९६८९९३१५१४ / ९६८९९३१७७७ / ९६८९९३९७९८
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
पुणे महानगरपालिका सायकल क्लब सायकल उपक्रमांत भाग घेण्यासाठी एका उपक्रमापुरते तात्पुरते सभासदत्वासाठी अटी/नियम :
१) पुणे महानगरपालिका सायकल क्लबच्या वतीने संकेतस्थळावर जाहिर केलेल्या  सर्व उपक्रमात स्वयंप्रेरणेने सहभागी होता येईल. विविध ठिकाणी होणा-या सायकल फेरीसाठी आपली स्वत:ची सुस्थितीतील सायकल घेऊन वेळेवर उपस्थित रहावे लागेल.
२) लघुकालीन सायकल फेरी/दिर्घकालीन सायकल फेरी/सायकल रॅली व विविध कार्यक्रमांसाठी आपणांस आपल्या स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल. तसेच पुण्यात व पुण्याबाहेर असणा-या सायकल फेरीसाठी आवश्यकतेनुसार आपण आपला चहापान, जेवण, राहणे, वाहतुक, वैदयकिय व इतर अनुषंगिक खर्च आपण स्वत:च करावयाचा आहे.
३) सायकल चालवताना हेल्मेट सक्तीचे असून, सर्व वाहतुक नियमांचे पालन करावयाचे आहे.
४) उपक्रमांची माहिती पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द  केली जाईल .
५) सायकल फेरीमध्ये व बाहेर आऊटडोअर सायकलिंगमध्ये सायकल चालवताना पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असून, आपल्यामुळे इतरांना त्रास होईल असे वर्तन करू नये व सर्वांनी शिस्त पाळणे आवश्यक आहे.
६) आपण आपल्यासोबत बाळगत असलेल्या सर्व साहित्याची जबाबदारी आपली राहील.
७) सायकल चालवताना कोणत्याही कारणामुळे प्रसंगी गंभीर प्रसंग उदभवून,गंभीर अपघात होऊन प्रसंगी मृत्युही होऊ शकतो याची मला जाणीव आहे.हयाबाबत पुणे महानगरपालिका सायकल क्लब जबाबदार राहणार नाही.
८) पुणे महानगरपालिका सायकल क्लबच्या उपक्रमात स्वयंप्रेरणे, पर्यावरण रक्षणासाठी, ध्वनी/वायू प्रर्दुषण कमी करण्यासाठी, आरोग्यासाठी तसेच स्वत:च्या आनंदासाठी सामील होत आहे.
९) सदरचे राबविण्यात येणारे सर्व उपक्रम जनहितार्थ असून स्वयंप्रेरणेचे त्यात सहभागी व्हावयाचे आहे.यासाठी कोणताही मोबदला मिळणार नाही.
१०) सदर सभासदत्व हे नि:शुल्क असून हे सभासदत्व फक्त सायकल उपक्रमात भाग घेण्यासाठी तात्पुरते स्वरूपाचे आहे. हयाबाबत कुठल्याही प्रकारची तक्रार स्वीकारली जाणार नाही.तसेच हे सभासदत्व एका उपक्रमांपुरते मर्यादित असून  उपक्रमात सहभागी होऊ देणे अथवा न देणे अथवा सभासदत्व करून न घेणे याचे अधिकार पुणे महानगरपालिका सायकल क्लबने राखून ठेवले आहेत.
११) सदर उपक्रमांत १८ वर्षापुढील व ६० वर्षापर्यंत भारतीय नागरीकांस भाग घेता येईल.
१२) रॅलीमध्ये कोणत्याही मौल्यवान वस्तु बाळगू नयेत,तसेच आपणास आवश्यक असणारी औषधे बरोबर ठेवावी.
१३) वरील सर्व अटी/नियम मला मान्य असून मला पुणे महानगरपालिका सायकल क्लबच्या एका उपक्रमापुरते तात्पुरते सभासद करून घेणेस विनंती आहे.

नाव : *
जन्मदिनांक : *
MM
/
DD
/
YYYY
रक्तगट :
मोबाईल क्रमांक : *
आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक : *
ईमेल आयडी : *
टी शर्ट साईज
Clear selection
रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी वर नमूद केलेल्या सर्व अटी व शर्ती मला मान्य आहेत. *
टिप:- रॅलीसाठी  शनिवार दि. १० जून २०२३   रोजी  सकाळी ०६:००  वाजता पुणे महानगरपालिका मुख्य भवन शिवाजीनगर, पुणे ४११००५ या ठिकाणी जमावे. रॅली समाप्ती नंतर अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.  
तसेच सहभागी सायकल स्वारांना G 20 टिशर्ट, टोपी, मेडल, देण्यात येणार आहे.
A copy of your responses will be emailed to the address you provided.
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
reCAPTCHA
This form was created inside of Pune Municipal Corporation. Report Abuse