कृषी तंत्रज्ञान

‘सीएनजी’ ट्रॅक्टर्समुळे शेतकऱ्यांना होणार भरघोस फायदा!

CNG tractors will benefit farmers!

केंद्र सरकार (Central Government) व राज्य सरकार (State Government) शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित असते, योजनांचा प्रमुख उद्देश्य शेतकऱ्यांच्या आर्थिक सुबत्ता,(Economic well-being) वाढ निर्माण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील असते, प्रयत्नांना तंत्रज्ञानाची जोड असल्यास, कमी खर्चामधून अधिक उत्पन्न मिळवता येते. यासाठी सरकार नेहमी प्रयत्नशील राहते, नुकतेच केंद्रीय केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी (Union Transport Minister Nitin Gadkari) यांनी शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल म्हणजेच सीएनजी ट्रॅक्टर्सचा (Of CNG tractors) पर्याय उपलब्ध केला आहे.

शेतीमध्ये सर्वात उपयुक्त साधन म्हणजे ‘ट्रॅक्टर’ याचा उपयोग लागणीपासून ते शेतमाल घरी येण्यापर्यंत होत असतो. ट्रॅक्टरच्या डिझेल पेट्रोलमुळे (Due to diesel petrol) शेतकऱ्यांचे अधिक पैसे खर्च होतात परिणामी त्यांच्या उत्पादन खर्च मध्ये देखील वाढ होते, अशा वेळी सीएनजी ट्रॅक्टर्स शेतामध्ये वापरले घेल्यास उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकेल. सीएनजी ट्रॅक्टर्समुळे जवळपास दीड लाख रुपयांची शेतकऱ्यांची बचत होऊ शकते.

हे ही वाचा :सिताफळ लागवड करा व मिळवा भरघोस उत्पन्न ! जाणून घ्या; सिताफळ लागवडीची संपूर्ण माहिती…

चला तर सीएनजी ट्रॅक्टर च्या माध्यमातून शेतकऱ्यांना कसा फायदा होईल हे आपण पाहू.

सीएनजी ट्रॅक्टरच्या माध्यमातून पेट्रोल व डिझेल वरील खर्च कमी होऊन, दीड लाख रुपयेपर्यंत बचत (Savings) होऊ शकते, त्यामुळे शेतीवरील उत्पादन खर्च कमी होण्यास निश्‍चित मदत मिळेल.

सीएनजी ट्रॅक्टरचा देखभाल खर्च कमी प्रमाणात असतो, तुलनेने पेट्रोल व डिझेल वरील ट्रॅक्टर्स कार्बन डाय-ऑक्साइडमुळे (Due to carbon dioxide) वारंवार बिघाड होऊन दुरुस्ती खर्च (Repair costs) वाढू शकतो.

हे ही वाचा :यंदाच्या वर्षी सोयाबीनचे उत्पादन विक्रमी होणार का? सोयाबीन उत्पादकांनी घ्या ‘ही’ काळजी…

डिझेल पेट्रोलवरील इंजिनाने (Engine) मोठ्या प्रमाणात प्रदूषण (Pollution) वाढते, मात्र सीएनजी वापरामुळे प्रदूषण सत्तर टक्के पर्यंत कमी होऊ शकते.

पेंडयाच्या (Pendya) माध्यमातून बायो-सीएनजीचे उत्पादनही शक्य आहे. बायो-सीएनजीच्या (Of bio-CNG) माध्यमातून शेतकरी नफा (Profit) कमावू शकतात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

कमी कालावधीत जास्त उत्पादन मिळून देणारे, ‘उडीद’ पिकाबद्दल जाणून घ्या, संपूर्ण माहिती

जिओ कंपनीची भन्नाट ऑफर! आता 5 जीबी ‘इमर्जन्सी डेटा लोन’ मिळणार, वाचा सविस्तरपणे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button